पान:Samagra Phule.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १४१ खरबरीत जमिनीवर मृतप्राय होऊन पडत; परंतु डोळ्यास पुरती निद्रा म्हणून ठाऊक नाही, बिचाऱ्यांस निद्रा येणार ती कोठची? एक तर पहिली त्यांस धनीसाहेब केव्हा पुकारतील याची जबर धास्ती, दुसरे पोटामध्ये पुरतें अन्न नसल्यामुळे जीव हलनक होऊन परम क्लेश होतात, तिसरे अंगावर चाबुकाचे फटके बसल्यामुळे सर्व शरीर स्वताळून जाऊन त्याचे वेदनेने तळमळ करीत या कुशीचे त्या कुशीवर होत आहेत, चवथें घरचे मनुष्यास आपल्यामुळे किती दुःख होत असेल, याचा विचार मनात येऊन अंतःकरणांत दुःखाचा डोंब पाझरल्यामुळे टपटप नेत्रांवाटे आधूंच्या धारा चालत आणि ईश्वरास प्रार्थना करीत की, भगवन्न, आता आमची काही तरी करुणा तुला येऊ दे! आम्हांला या दुःखापासून मुक्त कर, आमच्याने हे दुःख सहन होत नाही, आतां आमचे प्राण जातील तर बरे होईल, अशा संकटात व अशा विचारांत सर्व रात्र उजडून जात असे. त्यांस जी जी दुःखें झाली ती सर्व पूर्णपणे वर्णन करूं गेल्यास भाषेतील शोकरससंबधी शब्द पुरतील, की नाही याचा संशय आहे. तात्पर्य,- अमेरिकन लोकांनी आज शेकडो वर्षांपासून चालत आलेली ती चाल बंद करून गरीब अनाथ लोकांस त्या अति क्रूर लोकांच्या जुलुमांपासून मुक्त करून त्यांस सर्वस्वी सुखी केले. या गोष्टीचा शूद्रादि अतिशूद्रांस, इतर लोकांपेक्षा अधिक संतोष वाटत असेल, कारण गुलामाच्या स्थितीत असता मनुष्यमात्रास किती दुःखें सोसावी लागतात, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांयांचून अथवा वर सांगितलेले गुलामांवांचून इतर लोकांस थोडाच असेल. आता त्यांच्यामध्ये व वरच्या गुलामांमध्ये इतकंच अंतर आहे की, पहिल्यांस 'घट लोकांनी जिंकून गुलाम केलें व गुसांस दुष्ट लोकांनी एकाएकी जुलमानें धरून गुलाम केलें; बाकी सर्व अंशी ते त्यांच्याशी मिळतात त्यांच्या स्थितीमध्ये व गुलामांचे स्थितीमध्ये लिलप्राय भेद नाही, त्यांनी जी जी संकटे सोसली ती सर्व शूद्रादि अतिशूद्रांस भट लोकांपासून सोसावी लागली, किंबहुना त्यांपेक्षा अधिकदेखील म्हटले असता काही चिंता नाही. त्यांस जी दुःखें प्राप्त झाली ती ऐकूनच मात्र पाषाणहृदयी मनुष्याचें अंतःकरण तर काय, परंतु प्रत्यक्ष मूर्तिमंत काहाराचा पाषणही कलकल उकलून आंतून दुःखाथूचे लीटचे लोट चालून त्यानमुळे पृथ्वीवर इतकें जळ होईल की, ज्यांचे पूर्वजांनी शूद्रादि अतिशूद्रांस गुलाम केले त्यांचे जे वंशज हल्लीचे भटबधु त्यापैकी जे आपले पूर्वांसारखे कठोर हृदयाचे नसून कोमन अंतःकरणाचे आहेत, त्यास असें वाटेल की, हा एक जलप्रलयच आहे. आमचे दयाळू इंग्रज सरकारास शूद्रादि अतिशूद्रांस भट लोकांपासन काय काय जलूम सहन करावे लागले व हल्लीहि सहन करीत आहेत याविषयीची मुळीच माहिती नाही. तेजा याजविषयी चौकशी करून आपणास माहिती करून घेतील तर त्यास असे कळेल की, आम्ही जे ने हिंदुस्थानचे इतिहास निहिले त्यांतीला हा एक मोठा अति महत्त्वाचा भाग गाळला. त्यांस त्याचे दुःखाची माहिती एकदां झाली हणजे फार वाईट बादून आपल्या ग्रंथात, जेथे अति निकृष्ट दशेस येऊन पोहचलेले व दुष्ट लोकांनी गांजलेले ज्यांच्या दःखास पारावार नाही अशा लोकांचे स्थितीची उपमा दणे झाल्यास, शूद्रादि अतिशूद्रांच्याच स्थितीची उपमा योग्य साजेल असे वाटेल. त्यातून कवास पुष्कळ