Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ब्राह्मणांचे कसब

११७

तीर्थयात्रेठायीं बगळ्याचे परी ।।
द्रवहीन करी भाविकास ॥ ४ ॥
व्यातिपात पुत रिकामक्या वेळी ॥
फिरे आळोमाळी भीकमाग्या ।। ५ ।।
ग्रह आकाशीचे सोंग उभे केलें ॥
लळिती आणिलें द्रवलोभे ॥ ६ ॥
लाथाबुक्या बाकी ' दान सर्व घेई ।।
बुडवूनी जाई कुणब्यास ॥ ७ ॥
तगाद्याची तुम्ही वाट पाहूं नका ॥
मारा बोंबा हाका जोशा नावें ॥ ८ ॥
व्याजबट्ट्यासुद्धां नाटक्याची बाकी ॥
फेडा बीनचुकी रोखारोखी ॥ ९ ॥
आतां तरी तुम्ही शुद्रा भोंदु नका ॥
जोतीबाचा ठोका ऐकुनिया ॥ १० ॥

ब्राह्मणाचे साधारण गुण व कामें - यांचा अति लोभ व तो तृप्त करून घेण्यासाठी जी ठकबाजी करितो याविषयी.
॥ अभंग ॥

उत्तम ब्राह्मण जन्म हिंदुस्थानी ॥
दिसे शुद्रावाणी अखंडीत ॥ १ ॥
दोरा घालुनीया शुद्र द्विज केला ॥
नाहीं पालटला जरा कोठे ॥ २ ॥
द्वाड खोडकर स्वभाव देहाचा ।।
जाईना सुळीचा वज्रलेप ॥ ३ ॥
स्नान संध्या नित्य टिळाटोपीवर ।।
घेती मांडीवर जारीणीस ।। ४ ।।
नेसुनी सोवळे विटाळसा' झाला ॥
शिवेना शूद्राला शुद्ध कैसा ॥ ५ ॥


शिवाय.