पान:Samagra Phule.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय श्रवण वेदाचें शुद्रा बंद केलें ॥ मुळी शिकवीलें इंग्लिशांना ॥ ६ ॥ भूदेव होवूनी पायां पडविती ॥ पायथीं पडती रांडांच्या हो ॥ ७ ॥ शुद्राला भोजन दुरून वाढिती ॥ मद्यपान घेती शाक्तमिषे॥८॥ पायधुववणी शूद्रा तीर्थ देती ॥ मुखरस पिती यवनीचा ॥ ९॥ विद्याहीन शूद्र लज्जाहीन झाला ॥ जोडा सांभाळीला ब्राह्मणाचा ॥१०॥ हातांतील जोडे मधीं टांकू नका ॥ शोध करा नीका जोती म्हणे ॥ ११ ॥ -समाप्त- NO