या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
महात्मा फुले : समग्र वाङ्मय
पोटाने गेली ॥ मरुं घातली ॥
भट्टा भेटिला बोलिवले ॥
अती गरीबी म्हणोन त्याजिले ॥
बाई वारली || शेतीं पुरली ॥
गरुडपुराण कोठें लपलें ॥
भट्टाने तोंड केलें काळें ||
राणीबाई | लक्ष देई ||
दुःख हैं रडून गाईलें ||
द्विजांनी शुद्रा गांजिलें ॥
शिकिव शुद्राला ॥ पंगु बंधुला ॥
दास ब्रहम्यानें ॥ मुळीं केलें ॥
ज्ञान देण्याचे बंद ठेवलें ॥
किर्ती ऐकून | आलों धावून |
जगामधीं दास सोडविले ॥
धडे त्वां कैकाला दिले ॥
राव जोतिचे ॥ मार फुलांचे ॥
ओळखून शत्रू झोडिले ||
तगादे यम दारी बसले ॥ ५ ॥
८
ब्राह्मण शुद्रास प्रतिवर्षी भाद्रपदमासी पक्षांत व वर्षातील साधारण सणावारांत
व सूर्यचंद्राच्या ग्रहणकाळी कशा भुलथापी देऊन बुडवितो याविषयीं
॥ अभंग ॥
शेती दास केला सोडीना शुद्राला ॥
कर बसविला वर्षासन ॥ १ ॥
वसुलाचा थाट भाद्रपद मासीं !!
सोडीना पुत्रासीं जन्मभर ॥ २ ॥
संक्रांती पाडवा भोके सर्व सणीं ॥
लाज नाहीं मनीं वाटोळ्याच्या ॥ ३ ॥