पान:Samagra Phule.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मणांचे कसब ११५ वडील पुत्राला ।। जीन घातला ॥ गरुडपुराण नाचविले ॥ विधी नऊ दिवस करविले ॥ दाहावा दिवस ।। जमवी सर्वांस ॥ भाताचे ऊंडे मांडीवले ।। कावळ्या भोजन देविवलें ॥ भांडी कुंडी दान ॥ छत्री निदान ।। मन काठीवर बसलें ॥ शेवटी जोड्याने तृप्त झाले ॥ धूर्त अट्टल ॥ केला सट्टल ॥ भट्टानें शुद्रा ठकविलें ॥ ज्ञान सर्वांचे कसें खुंटलें ॥ कर्जबाजारी ॥ झाला बहुपरी ॥ धर्म थापिने किती लुटले ॥ त्राण तेराव्या नाही उरलें ।। भट्ट धनको ।। शुद्र ऋणको ।। कर्ज शेतावर काढिलें ॥ भोजन जातीला दिलें। थोड्या दिवसांत ।। व्याज मुदलांत ॥ गहाणखत चोख नवें केलें ॥ मिराशी भट्ट वारस झाले ॥ निमकहरामी ॥ मोठा गुलामी ।। चाकरी यजमाना ठेवलें ॥ तगादे यम दारी बसलें ॥ ४ ।। गवत काढिती ॥ मदत करिती ।। बाईचे सुखसोहळे गेले ॥ वेळेला तुकडा ना मिळे ॥ वित्त उडालें ॥ दांत पडले ॥ कोरडी भाकर ना गिळे ।।.. मुलाकडे पाहून तळमळे ॥ -