Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४

महात्मा फुले : समग्र वाङ्मय

पुरे कर आतां ॥ खोटी ममता ॥
फुसफुस पुराण लाविलें ॥
व्यर्थ हे जन्म दवडिलें।
द्विज हयगई ॥ करतां सोई नाहीं॥
कैक पाहा आधोगती गेले ।।
तगादे यम दारी बसले ॥ २ ॥
अती व्यापिला ॥ प्राण त्यागिला ॥
वेटुळे ममतेचे पडले ॥
भट्टाला मधीच कोंडिले ॥
हळूच निघाला । घरी पोहचला ॥
भोजन यथासांग केले ।।
कारटे स्मशानी बनले ॥
मनी योजून ।। ग्रह धुंडून ।।
त्रिपादा शोधून काढले ॥
मन भौताचे खचविले ॥
विधी केले ॥ मंत्र बोलिले ॥
पिटाचे पुतळे करविले ॥
दर्भ तीर्थाने स्थापिले ॥
द्रव्य घेवून ॥ अग्नी देऊन ॥
नाडून घरी परत गेले ॥
डोम कागाने अंती पिडले ।।
आह उरले । स्वस्थ बसले ।
बाईला समजाऊ लागले ॥
मुलाने पोटासी धरिलें ॥
कंवटी फुटली ॥ सर्व उठलीं ॥
कंबर बाईची खचली।
घरी मित्रांनी पोहचवली ॥
कारटा येई ।। हळूच सुचवी ॥
बेत विधिचे ठरविले ॥
तगादे यम दारी बसले ॥३॥