Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ब्राह्मणांचे कसब

११३

वार्ता ऐकून ॥ आला धावून ||
पंख कागाचे फडफडले ॥
सोंग भट्टाचे मधी आलें ।
चित्ता उडाला ॥ डाव मांडिला॥
भडभड पुराण वाचिले ॥
दानधर्मास सुरु केले ॥
दुखणे जड । मधी बडबड ॥
ऐकता कानठाळ बसले ॥
रोगी ऐकेना बोले ॥
दान मागे दान ॥ पशु गोदान ॥
अखेर जोडे घेतले ॥
तगादे यम दारी बसले ॥१॥
स्त्री गरगर । घार जसी फिरे ।
अश्रुपातांचा लोट चाले ॥
हृदयी काळीज होरपळे ॥
मानला खाई ॥ भिरभिर पाही ॥
पतिकडे नीट न्याहाळीले।।
जसे का आकाश कोसळले ।।
उठे लवलाही । पोराकडे जाई ।।
उचलून कडेवर घेतले ॥
दुग्ध घाईने पाजिले ॥
सोडी झटकून ॥ येई परतुन ।।
ब्राह्मण मधी आडवे पडले ॥
बोलणे स्त्रीचे बंद केले ॥
जीव तडफडे || रोख पतिकडे ॥
खाली हनवटिला धरले ।।
मुके वोटाला हाळूच दिले ।। दान करूया ॥ स्वस्थ मलं या
॥ क्लेश संसार पुरे झाले ॥
आमंत्रण देवाचे आले ॥
एच २२ 99