पान:Samagra Phule.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय घर नाहीं दार ॥ वाढला आहार ।। आखेर पोट दळणावर ।। भोंवतीं पोरें जोजार ।। स बाईस जाऊं द्या ॥ पोट भरूं द्या | Fa गाईन दुसऱ्या मधीं सार ।। टाळी देतो हातावर ।। राणीबाई ।। शोधून पाही ॥ पाप हे तुझ्या शिरावर ॥ काय ! तूं जवाब देणार? || समज कांहीं धरीं ॥ उमज अंतरीं। कर विद्येचा प्रसार ।। पीनामा सोडू नये कर्तव्य सार ॥ जोतीराव ॥ कसा देई डाव ।। गवसून राजनीती वर ॥ शहाणाटक आरपार ||५|| ७ शूद्राच्या अंतकाळी ब्राह्मण वैद्य भटजी व कारटा बनून त्याच्या बायकोस क्रुरपणे कसा नाडितो याविषयी ।। पवाडा॥ शूद्र जर्जर ॥ चाले काठीवर ॥ तीन पायाचे पशू बनले ॥ तगादे यम दारी बसलें ॥ करी तळमळ । बुद्धिला बळ ।। मन संसारी अती रिझले ।। Sm मायाजंजाळी किती रुतले ॥ झाला घाबरा || पडे पसारा ।। लष्कर वैद्याचे हलले ॥ कैदी पडद्यामधी केले ॥ नाड्या पहाती ॥ मात्रा योजिती ।। औषध किमतिचे दिले ॥ पैसे धांदलिने नेले ॥