या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ब्राह्मणांचे कसब
१११
पैशावर जीव ॥ येईना कीव||
अर्ध्या करवी धन्यावर ।।
पैसा देई गाहाणावर ॥
वेळ पाहून । संधि साधून
॥
मागणी नेट त्याजवर ॥
तगादा धाडी पाठीवर ॥
दाम दुप्पट ॥ सर्व एकवट ॥
नोंदिती गहाणखतावर ॥
दुमाला पुस्त रजिष्टर ॥
संध्या सोवळे ॥ भस्म टळटळे ॥
कडकली मर्जी धन्यावर ॥
निंदितो खर्चिक हा फार ॥
वर्जिले घर ।। घरी व्यापार ।।
चालवी हात गाहणावर ।।
जाळितो पोट व्याजावर ॥
हातावर देई ॥ लेहून घेई ॥
वायदा आट स्टांपावर ॥
ठोकली अर्जी आखेर ।
धन्यावर जीव ॥ केली मोठी कीव ।।
बक्षिस बीनभाडे घर ।।
शहाणा ठक आरपार ॥४॥
घालूनी फासा || कोंडिला खासा ॥
मोहरा हिमतीचा फार ।।
कपाळ टेंकी हातावर ॥
तडजोड केली ॥ खातीं चढावेली ॥
बेदावा वतनावर ॥
केला शेवट उपकार ॥
उपाय खुंटला । ताप पेटला ।।
झाला तुरंगी वतनदार ॥
स्त्रियेवर पडला संवसार ॥