Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०

महात्मा फुले : समग्र वाङ्मय

कामाचा नीर ।। पोशिला धूर ।।
घराला जाई सुत्रधार ॥
शहाणा ठक आरपार ।। २ ।।
पाडवा गुढी ।। ढाल फडफडी ॥
रामजन्माचा पसारा ॥
काढी हनुमंत पाठीवर ॥
आषाढमासी ॥ एकादशी ।।
बाकी चार सोमवार ॥
पूजवितो बैल बेंदूर ॥
नागपंचमी ॥ कृष्ण अष्टमी ॥
ब्राह्मणभोजनाचा भार ।।
चंगील तूप पोळीवर ॥
पिंड मांडितो ॥ पाया पडवितो ।।
भादवी भट्टि व्यापार ॥
माजला तटू गुलजार ॥
विजय दशमीस ।। पुजवी घोड्यांस ॥
फराळ धनतेरस वर ॥
लक्ष्मी-पूजन वहीवर ।।
तुळशी लग्नांत । मकरसंक्रांत ॥
वाचितो वर्षफळ सार ।
मजुरी घेतो हातावर ॥
पैसा उडाला ॥ शुद्र बुडाला ॥
उरला होळी संवस्कार ॥
मारवी बोंब आखेर ॥
मनी कल्पिलें ।। ग्रहण योजिलें।
दानधर्माचा भडिमार ||
शहाणा ठक आरपार ॥३॥ हिशेबी घोळ ॥ सर्व गोंधळ ।।
वाढवी कर्ज डोईवर ॥
आंतून होई सावकार ॥