या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ब्राह्मणांचे कसब
१०९
बोध करितो || महत्व शिकवितो ॥
चुकेना नित्य नेमाला ||
गरीबी दावी भोळ्याला ॥
अट्टल धूर्त || पाहून मुहूर्त ॥
समाप्ती दिवस नेमिला ||
उपटी शालदुशाल्याला ||
गोडी लावूनी || होई कारकून ॥
आटपी सर्व कारभार ॥
शहाणा ठाक आरपार ॥ १ ॥
उघडी दप्तर ॥ पाही सत्वर ॥
रोखे निवडी प्रतवार ॥
तगादे धाडी घरोघर ॥
पैसा उगवी ॥ नोक दाखवी ||
हुशारी छाप धन्यावर ||
अर्ज्या दांड कुळावर |
निय सोडिती । फिरे कोडती ' ॥
माठला अर्जी वाचणार ॥
ठराव पाती बरोबर |
कुळा घरी जाई ॥ सूचना देई ||
अर्जी केली तुजवर 11
सांगतो फेड उपकार ॥
माझी समजूत ॥ काढ एकांत ॥
घेवितो तुमची तकरार ॥
करवितो हप्ते मुकरर ॥
करून फितुर ॥ मुठ केली गार ॥
धन्याची समजूत वरवर ॥
उभयतां देई गाजर ||
फिरूनी भागला ॥ खरा श्रमाला ||
झोप आली आंगी सुरसुर ॥
अंगमोडे देई वारंवार |
कोडतात.