या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
महात्मा फुले : समग्र वाङ्मय
।। अभंग ॥
जळो जळो तुमचे जिणे ॥
उद्योग्या आधी ताजे खाणे ॥ १ ॥
हे वा कृत्य लाजिरवाणें ॥
समजोत कपटी शहाणे ॥ २ ॥
घ्यावी घ्यावी माझी भाक ।
जरी कां सांगेन अनेक ॥ ३ ॥
स्वकष्टाने पोटें भरा ॥
जोती शिकवी फजितखोरा ।। ४ ।।
६
ब्राह्मण शूद्राचे घरी पोथी वाचायाचे निमित्ताने शिरून त्याच्या संसार खटल्यात हात घालून त्यास कसा बुडवितो याविषयी.
॥ पवाडा ।।
बामनी कावा ॥ समजुन घ्यावा ।।
आहेत आकलेचे खवरदार ॥
शहाणे ठक आरपार ॥
ऋषिमंडळ ॥ धर्माचे बळ ॥ वेद सबळ ।।
कडक बिजली श्रापाचे घर ॥
देवा'लाथ छातीवर ।।
शिपाई क्रुर लेखनिस धार ॥
दास वा केले महावीर ।।
ब्रह्मया मुख्य शिरावर ॥
रणी रणशूर ॥ घुसे वेशीर ॥
तिराचा मार अनीवार ।।
परशरामाचे लष्कर ॥
विद्याहीन ॥शूद्र पाहूनी ॥
हळूच कसा गांटितां त्याला ।।
लागतो पोथ्या वाचायला ॥
भृगुनामक ऋषीनं विष्णूच्या छातीवर लाथ मारली होती.