Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ब्राह्मणांचे कसब

१०५

मध्ये उभा राहे हातीं अंतरपाट ।
मंगळाचा पाठ सुरू केला ॥ ११ ॥
टाळ्यांचा गोंधळी वाद्यांचा दणाण ।।
म्हणे शुभ लग्न सावधान ॥ १२ ॥
वधुवर दोघे बिचारी अज्ञानी ।।
दिले गुंतवूनी जन्मभर ॥ १३ ॥
अगांतुक बाकी धांदलीने येती ।।
हात पसरिती पैशासाठी ॥ १४ ॥
सूत गुंडाळूनी वधूवरां कोंडी ॥
दक्षिणा ती तोंडी बीजमंत्र ॥ १५ ॥
काड्यामुड्या जाळी लज्जाहोम केला ॥
नाही मनीं धाला लज्जाहीन ॥ १६ ॥
विन उभयतांच्या काळ तेलसाडी देतां ॥
नाक मुरडतां वेळ जाई ।। १७ ॥
फार थोडी ह्मणे मांडवखंडणी ॥
घेई तो भांडूनी अखेरीस ॥ १८ ।।
परजातीवर तुम्ही सोपू नका ॥
बुडवितां फुका धर्ममीषे ॥ १९ ॥
वडील धाकुटे स्नेही उभयतांचे ॥
पंच स्वजातीचे निवडुनी ।। २०॥
वर्ष वय गुण प्रित परस्पर ।
पाहा सारासार तपासूनी ॥ २१ ॥
देवा प्राथूनिया घालवावी माळ ।।
मेळऊनी मेळ आनंदाचा ।। २२ ।।
ब्राह्मणांचे येथें नाहीं प्रयोजन ।।
द्यावे हाकलून जोती ह्मणे ।। २३ ॥


साड्याच्या दिवशी धर्माच्या हिंमाईतीनं शूद्रापासून आडवून पैमा फार घेतात.