पान:Samagra Phule.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय ताप येऊनीया तान्हे घाबरलें ॥ मृत्युपंथी गेले लागलेच ॥ १०॥ पुत्र उत्साहाच्या सुखसोहळ्याचा ।। आनंद मुळीचा भंग केला ॥ ११ ॥ पोटे जाळू नका लोकां फसवूनी ॥ देवा रागऊनी जोती म्हणे ॥ १२ ॥ ३ ब्राह्मण जोशी शूद्राच्या लग्नांत त्यास कसा बुचाडतो याविषयी । अभंग ॥ मागणीच्या वेळी जोशीबुवा येई ॥ राशीवळ पाही दिमाखाने ॥१॥ स्वहिताची आस न्यून कल्पोनियां ॥ ग्रह योजूनिया जप स्थापी ॥ २ ॥ लग्न वर्तवितां दुकान मांडलें । गणपती केले सुपारीचे ॥ ३ ॥ खारका खोबरें नैवेद्याचा भार ।। दक्षिणा रीतसर पैसालूट ॥ ४ ॥ टिपी कागदांत तिथी नेमिलेल्या ।। कुंके शोभविल्या हाती दिल्या ।। ५ ।। वर्ष वय गूण तोलून पाहाणी ॥ नाहीं येत मनीं ज्याच्या लेश ॥ ६ ॥ लग्नाचे आधी मोठी गडबड ।। धावे दुडदुड दोहींकडे ।। ७ ॥ सुरवात केली वरा वस्त्रे देई ।। भाळी टिळा लावी देऊळांत ॥ ८ ॥ उठे झडकरी मांडवांत जाई ।। बोले लवलाहीं त्वरा करा ॥ ९ ॥ किन हाती शस्त्रे देई पाठराखे केले ॥ B मामा नेमियेले परस्पर ।। १० ॥ गा