या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ब्राह्मणांचे कसब
१०३
सूड घेतला || नीच मनिला ||
शिवतां जाती आंघोळीस ॥
शिकवितो कोण लिहिण्यास ॥
शोध स्वताचा । जोतिरावाचा ।।
कळिवतो राणीबाईस ॥
सोडवी गुलाम केल्यांस ॥ ५ ॥
२
ब्राह्मण जोशी शूद्राच्या घरी मूल जन्मलें म्हणजे येऊन कसा पैसा
उपटितो याविषयी
॥ अभंग ।।
सोहोम कोहोम नाद इतक्यांत ॥
आला गृहतात जोशीबुवा ॥ १ ॥
पुसे जन्मकाळ राशीचक्र मांडी ।।
चाळी बोटे कांडी वेडा जैसा ॥ २ ॥
न्याहाळुनी सर्व भोळ्या पित्या बोले ॥
मुळावरी आले बाळ तुझ्या ॥ ३ ॥
कृत्र्यिम्याचे बोल पडताच कानीं ।।
घाबरले मनीं विद्याहीन ॥ ४ ॥
माता बाळाकडे पाहुनिया रडे ।।
सर्व केले वेडे पाखांड्यानें ॥ ५ ॥
पाहून ही संधि उपाय सुचवी ॥
जपास बसवी ब्राह्मणास ॥६॥
अनुष्ठानी दान ब्राह्मणांस करा ॥
आलें विघ्नवारा बसू नका ॥ ७॥
ग्रहधाक पीडा ह्मणे कर्ज काढूं ॥
भांडीकुंडी मोडूं सुखासाठीं ॥ ८ ॥
जप अनुष्ठान यथाविधि केला ॥
मूट नागविला ग्रहमीषे ॥ ९ ॥