पान:Samagra Phule.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय (S स हमत चांडाळास ॥ उष्टे देण्यास ।। मनाई धर्मी ब्राह्मणांस ।। पाप जोडे देतां तुम्हास ॥ दारी बसू नका ॥ मारूं नका हाका ॥ त्रासलो पाहून तोंडास ॥ उठांना मारीन दगडास ।। काय तुझा धर्म ।। कळू दे रे वर्म । भिक्षा शूद्राची खातोस ॥ कोणता धर्म तुझा खास ॥ सोड गर्वास ॥ लाग मार्गास ॥ जाळ या खोट्या धर्मास ॥ जपले बहुत एकीस ॥ ४ ॥ धन्य राणीबाई ।। झोप कसी घेई ।। आहेस मोाची धणीन खास || सोडवी दीन बंधूस ॥ सर्व जगाला ॥ धडा त्वां दिला ॥ बंद केले गुलाम करण्यास ।। लागेल बट्टा कीर्तीस ॥ नांव ऐकून ।। आलों धांवून ॥ कधी तूं येतीस पाहाणीस ? ॥ गांजिले मांगा माहारास ।। गोरे कामगार ॥ मोठा दरवार । सोपिती सर्व ब्राह्मणास ।। मनामधी भिती फार त्यांस ।। माहिती थोडी ।। मिजाज बडी । भोगिती नित्य आरामास । पुरविती हक्क पेनशनीस ॥ मांग महाआरी ॥ जेर झाले भारी ॥ विसरले आपल्या महत्वास ॥ उमजेना शत्रुकाव्यास ॥