Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ब्राह्मणांचे कसब

१०१

नित्य भिडून || मोड करून ॥
सोडिले नाही गर्भिणीस ।।
उपजल्या मारी बाळास ॥
द्विजवैरी || माहा जो आरी ॥
आखेर आणला जेरीस ||
पाताळी घातले त्यास ॥
शोध काढिले || नित्य वधिले ॥
पळविले परक्या भूमिस ॥
ओळख दे आता परभूस |
उरले सुरले || अति पीडिले ॥
ह्मणती मांग महा आरीस ।।
भेट ह्या जुन्या क्षेत्र्यास ॥
कुरकुर पुरे ॥ मन चुरचुरे ॥
सोड सुडाची आतां आस ॥
सांगतो नीट तुला खास ॥
नित्य विनवितो ॥ तुला सुचवितों ॥

भोगशील अखेर गोत्यास ||

जपले बहुत एकीस ॥ ३ ॥
केली धुळधाणी ॥। शिवेना कोणीं ॥
सहज बंदी उदमांस |
ठेविना कोणी चाकरीस |
दाण्याला रे महाग || पोटाची रे आग ||
सोई नाही पोट भरण्यास ॥
खाती मेल्या जनावरांस ॥
भूक माईना || कळ साहिना ।।
हातामधीं घेती कचकुलास ॥
धडाका उष्टें मागण्यास ॥
माईसाहेब || भाईसाहेब ||
हाका मारिती सर्वांस ॥
घरांत आल्यागेल्यास ॥