Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा

बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला ।
त्यागा ढोंगधतोऱ्याला ॥
मन उत्तम कामीं जपा आपल्या फौजेला ।
संभाळा मुळ आब्रूला ||
कीर्ति तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला ।
नित्य जपतों या जपाला ॥
कमी पडतां तुम्ही कळवा माझ्या लोकांला ।
सोडा मनच्या आढीला ||
सुबोधाचें पत्र ऐकतां शुद्धीवर आला ।
व्यंकोजी लागे कामाला ॥
शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला ।
रोगानें अती जेर केला ॥
त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला ।
शिवाजी सोसी दुःखाला ॥
यवनीं विरास भिडतां नाहीं कुचमला 1
शिवाजी रोगाला भ्याला ॥
सतत सहा दिवस सोसी तापदहाला ।
नाहीं जरा बरळला ॥
सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला ।
एकटा पुढे आपण झाला ॥
काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला ।
पडले सुख यवनाला ॥
कूळवाडी मनीं खचले करीतो शोकाला ।
रडून गाती गुणांला ॥