पान:Samagra Phule.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय हांबीरराव मदत पाठवी विजापुराला । बरोबर देई फौजेला ॥ नऊ हजार मोंगलांचा पराभव केला । ज्यानी मार्ग अडीवला ॥ विजापुरी जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥ शत्रुला पिडा होतां त्रासून वेढा काढला । मोगल भिऊन पळाला ॥ दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला । पाठवी शाहाजाहानाला ॥ जलदी करून शिवाजी वळली पुत्राला । लाविला नीट मार्गाला ।। तह करून शिवाजी नेती विजापुराला । यवन घेती मसलतीला ॥ शिवाजीचे सोवळे रुचलें नाहीं भावाला । व्यंकोजी मनीं दचकला ॥ निरास मनी होऊन त्यागी सर्व कामाला । निरा संन्याशी बनला ॥ शिवाजींने पत्र लिहीलें बंधु व्यंकोजीला । लिहितों पत्र अर्थाला ॥ वीरपुत्र म्हणवितां गोसावी कसे बनला । हिरा कां भ्याला कसाला ॥ आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला । " मळावांचून काटला ॥ कनिष्ठ बंधु माझ्या लाडक्या पाठी सायाला । तुम्ही कां मजवर रुसला ॥