पान:Samagra Phule.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा फुले : समग्र वाङ्मय ७६ काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा । केला खेळ गारूड्याचा ॥ लुटारू शिवाजी लुटला धाक गृह फौजेचा । खर्च नको दारूगोळीचा ॥ बहुरूपी सोंग तूलादान सोने घेण्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ ७॥ विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायला । शिवाजी कोकणांत गेला ॥ छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला । जमाव फौजेचा केला॥ गोवळकुंडी जाई मागून घेई तोफांला । फितीवलें कसें निजामाला ॥ करनाटकीं गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यंकोजीला ॥ लोभी व्यंकोजी हिस्सा देईना बळासी आला । आशेने फिरवी पगडीला ॥ बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टी पेटला । बिहाडी रागाऊन गेला ॥ शिवाजीला राग आला कोट छातीचा केला । कैदी नाहीं केलें भावाला ॥ तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला । खडा कानाला लावला ।।