पान:Samagra Phule.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ७५ रागाऊन लिहिले पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥ गुजर मनांत लाजला । निघून वराडांत मेला ॥ ॥ चाल ॥ आबदुल्याने । बेशर्थ्यांने ॥ फौज घेऊन । आला निघून ॥ राव प्रताप । झाला संताप ।। आला घाईने । गाठी बताने । घुसे स्वताने । लढे त्वेषानें ॥ घेई घालून । गेला मरून ॥ प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठ्याचा केला ॥ तोफ गोळ्या पोटीं दडती भिडती पन्हाळ्याला । गेले नाहीं शरण शत्रूला ॥ अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगी आला । हल्ला शत्रूवर केला ॥ गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला । पळीवलें विजापुराला ॥ शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला । मोठा अधिकार दिला ।। हंबिरराव पद सोडले त्याच्या नांवाला । शिवाजी मनीं सुखी झाला ॥ सेनापतीचे गुण मागे नाहीं विसरला । पोशी सर्व कुटुंबाला ॥ प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला । व्याही केलें गुजराला ॥