पान:Samagra Phule.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय पोर्चुग्यास धमकी देई मागे खंडणीला । बंदरी किल्ला वेढीला ॥ मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला । बनया धर्मा आड झाला ॥ दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला । दुजें मोहबतखानाला ॥ उभयतांचा बदली खानजाहान आला । मुख्य दक्षणेचा केला ॥ मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला । गोवळकुंडी उगवला ॥ मोठी खंडणी घेई धाकी धरी निजामाला । सुखें मग रायगडी गेला ॥ मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायला । लुटलें हुळबी शहराला ॥ समुद्रकांठी गांवें लुटी घेई जाहाजांला । केले खुलें देसाईला ॥ परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला । आणिक चार किल्ल्याला ॥ ॥ चाल ॥ हुकूम विजापूरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥ द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावे त्याचे मुलखाला ॥ शिवाजी सोडी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥ केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥ आर्जव करणे शिकला । भोदिलें सैनापतीला ॥ निघून विजापुरी गेला । क्रोध शिवाजीस आला ॥