पान:Samagra Phule.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय थोडी चाहूल कळली सावध उदेवानाला । करी तयार लोकांला ॥ थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥ रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला । सूर्याजी येऊन ठेपला ॥ धीर मोडक्या देई परत नेई सर्वांला । उगवी बंधु सूडाला ॥ उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला । घेतले सिंहगडाला ॥ गड हाती लागला तान्हाजी बळी घेतला । झाले दुःख शिवाजीला ॥ सिंहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला । रुप्याची कडी मावळ्याला ॥ पुरंधर माहुली घेई वरकड किल्ल्याला । पिडा जंजिरी सिद्ध्याला ॥ सुरत पुन्हां लुटी मार्गी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्त केला ॥ कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्यांमधी अनेक स्त्रीयांला । सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला । लाजवी औरंगजीबाला॥ सरनौबत वीर पाठवी खानदेशाला । शुरू केलें चौथाईला ॥ जलदी मोगल धाडी मोहबतखानाला । देई मोठ्या फौजेला ॥