पान:Samagra Phule.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ७१ ॥ चाल । औरंगजीवा धूर दीला । पुत्रासवे घोडा चढला ॥ मधींच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥ रात्रिचा दिवस केला । गाटले रायगडाला ।। माते चरणी लागला । हळूच फोडी शत्रूला ॥ स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वाला ।। ॥ चाल॥ हैद्राबादकर । विजापूरकर ॥ कापे थरथर । देती करभार । भरी कचेरी । बसे विचारी ॥ कायदे करी । निट लष्करी ॥ शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा । बंदोबस्त केला किल्ल्याचा ।। वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिऱ्याचा । पवाडा गातो शिवाजीचा॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ ६ ॥ शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला । बेत छाप्याचा सुचवीला ।। तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला ॥ मावळी हजार फौजेला॥ सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला । योजिले दोर शिडीला ॥ दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला । हळूच वर चढविला ॥