पान:Samagra Phule.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० महात्मा फुले : समग्र वाङ्मय शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस । नजरकैद करी त्यास ।। धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस । ठेविलें जवळ पुत्रास ॥ दरबाऱ्या घरी जाई देई रत्न भेटीस । जोडिला स्नेह सर्वांस ॥ दुखणे बाहणा करी पैसा भरी हाकीमास । गूल पाहा औरंगजीबास ॥ आराम करून दावी शुरू दानधर्मास । देई खाने फकीरास ॥ मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस । जसा का मुकला जगास ॥ दानशूर बनला हटवि हातिमताईस । चुकेना नित्यनेमास ॥ औरंगजीबा भूल पडली पाहुन वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥ निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठ्या दिमाखास ॥ पितापुत्र निजता टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥ जलदी करीती चाकर नेती टोकरास ॥ करामत केली रात्रीस ।। दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस । नेली युक्ति सिद्धीस ।। मोगल सकाळी विचकी दांत खाई होटांस । लावि पाठी माजमास ॥