या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा
६५
पती कैलासा गेले कळाले जिजाबाईस ।
पार मग नाहीं दुःखास ॥
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस ।
घेई पुढे शिवाजीस ॥
॥ चाल ।
अतीरूपवान बहु आगळा।
जसा रेखला चित्रीं पूतळा ॥
सवतीवर लोटती बाळा।
डाग लाविला कुणबी कुळा ॥
सवतीला कसें तरी टाळा ।
कज्जा काढला पती मोकळा ।।
खऱ्या केंसाने कापि का गळा।
नादी लागला शब्द कोकिळा ।।
मूख दुर्बळ राही वेगळा ।
अती पिकला चिंतेचा मळा ।।
झाला शाहाजी होता सोहळा ।
मनीं भूलला पाहूनी चाळा ॥
बहुचका घेती जपमाळा।
जाती देऊळा दाविती मोळा ।।
थाट चकपाक नाटकशाळा ।
होती कोमळा जशा निर्मळा ॥
खऱ्या इंखिणी घाली वेटोळा।
विषचुंबनी देती गरळा ।।
झाला संसारी अती घोटाळा ।
करी कंटाळा आठी कपाळा ॥
मनी भिऊन पित्याच्या कुळा।
पळ काढला गेले मातुळा ।।
एच-२२
८