पान:Samagra Phule.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ६३ शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास । वाढवी मोठ्या पदवीस ।। फिरंगोजीचें नांव घेतां मनी होतो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥ येशवंतशिंग आले घेऊन मोठ्या फौजेस । मदत शाईस्तेखानास ॥ सरनौबत भीती लुटी नगरी मुलखास । जाळून पाडिला ओस ॥ पाठी लागून मोगल मारी त्याच्या स्वारांस । जखमा केल्या नेताजीस ॥ राजगड सोडून राहीला सिव्हगडास । पाहून मोगलसेनेस ॥ जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास । खान राही तेथे वस्तीस ॥ मराठ्यास चौकी बंदी गांवांत शिरण्यास । होता भीत शिवाजीस ॥ लग्नवहाडी घुसे केला पुण्यात प्रवेश । मावळ सोबत पंचवीस ॥ माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस । कळाले घरांत स्त्रीयांस ॥ शाइस्त्यास कळतां दोर लावी कठड्यास । लागला खाली जायास ॥ शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास | तोडीले एका बोटास ॥ स्त्रिपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रुस । भित्रा जपला जीवास ॥