पान:Samagra Phule.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा फुले : समग्र वाङ्मय अपूर्व वस्तु घेऊन जाई विजापूरास । भेट मग देई यवनास ॥ पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास । साजे यवनी स्नेहास ॥ विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास । घेतले बहूतां किल्ल्यांस ॥ सर्व प्रांती लूट धुमाळी आणिलें जेरीस । घाबरें केलें सर्वास ॥ संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानास । जलदि केली घेई पुण्यास ॥ चाकणास जाऊन दावी भय फिरंगोजीस । फुकट मागे किल्ल्यास ॥ मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस । खान खाई मनास ।। आखेर दारू घालून उडवी एका बुर्जास । वाट केली आंत जायास ॥ वारोंबार हल्ले गर्दी करूं पाहे प्रवेश । शाईस्ता पठाण पाठीस ।। मागे पळति सर्व कोणी मानिना हुकूमास । भीति आंतल्या मर्दास ॥ लागोपाठ मार देत हटवि पठाणास । खचला खान हिंमतीस ॥ प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास । देई मुसलमानास ॥ फिरंगोजीला भेट देतां खुषी झाली यवनास । देऊन मान सोडी सर्वास ॥