पान:Samagra Phule.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ६१ सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा ।। पवाडा गातो शिवाजीचा॥ कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ छत्रपती शिवाजीचा ॥४॥ सावंत पत्र लिही पाटवी विजापूरास । मागे फौज कुमकेस ॥ बाजी घोरपडा बल्लोळखान येती सायास । शिवाजी करी तयारीस ।। त्वरा करून गेला छापा घाली मुधोळास । मारिलें बाजी घोरपड्यास ॥ भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस । घेतलें बापसूडास ॥ सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस । धमकी देई पोर्चुग्यास ॥ नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस । बांधिले नव्या जाहजास ॥ जळी सैनापती केले ज्यास भीती पोर्चुगीस । शोभला हुद्दा भंडाऱ्यास ॥ विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस । उभयतां आणले एकीस ॥ व्यंकोजी पुत्रा घेइ शाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥ शाहाजीचे सद्गुण गाया नाहीं आवकास । थोडेसे गाऊं अखेरीस ॥ सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास । उणे स्वर्गी सुखास ॥