पान:Samagra Phule.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० महात्मा फुले : समग्र वाङ्मय । चाल॥ जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाहि हिमानी । सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया । छोटे भाइकू हूल दिया । बडे भाईकी जान लिया । छोटेकूवी कैद किया । लोक उसके फितालिया ॥ मजला भाई भगादिया। आराकानमें मारा गया । सगे बापडूं कैद किया। हुकमत सारी छिनलीया ।। भाईबंदकू इजा दिया । रयत सब ताराज किया । मार देके जेर किया। खाया पिया रंग उडाया ।। आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ।। आपण होके ऐशआरामी । शिवाजीकू कहे हरामी । बेर हुवा करो सलामी। हिंदवाणी गाव नामी ।। ॥ चाल ।। आदी अंत [ न ] सर्वां कारण ।। जन्ममरण । घाली वैरण ।। तोच तारण । तोच मारण ।। सर्व जपून । करी चाळण ॥ नित्य पाळण । लावी वळण ॥ भूती पाहून । मनीं ध्याइन ॥ नांव देऊन । जगजीवन ।। सम होऊन । करा शोधन ।। सार घेऊन । तोड़ा बंधन ।। सरनौबती डंका हूकूम पालेकराचा ॥ घई मजुरा शाई [ रा] चा॥