पान:Geeta Rahasya BG Tilak.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ श्रीमद्भगद्गता. केले आहे; आणि कित्येकदां मूळांतीलच शब्द कायम ठेवून व पुढे " म्हणजे अमुक " असा त्याचा मराठीत अर्थ देऊन लहानसहान टीपा देण्याचे काम भाषांतरीतच उरकून घेतले आहे. परंतु इतके झाले तरी संस्कृत व प्राकृत भाषासरणी भिन्न असल्यामुळे मूळ संस्कृत श्लोकाचा पूर्ण अर्थ मराठीत व्यक्त करण्यास कांहीं शब्द जास्त घालावे लागतात; व कित्येकदां मूळांतील शब्द भाषांतरांत हवाल्याला द्यावा लागतो. हे शब्द लक्षांत येण्या करितां ( ) अशा गोल कंसांत दिलेले आहेत. संस्कृत ग्रं थांत श्लोका वा आंकडा श्लोकाचे अखेरीस असतो; पण मापांतरांत आग्हीं तो आरंभी दिला आहे. म्हणून एखाद्या लोकार्ये भाषांतर पहाणे अस ल्यास भाषांतरांतील त्या आंकड्यापुढला मजकूर वाचिला पाहिजे. भाषां- तराची ( रचना प्रायः अशी ठेविली आहे की, टीपा सोडून भाषांतरच वाचीत गेयास त्यांत अर्थाचा कोठेंहि खंड पडू नये, तसेच मूळांत एकच वाक्य "अर्थ एकापेक्षा जास्त लोकांत पुरे झाले आहे ते तितक्याच लोकांच्या भाषांतरांत तो अर्थ पुरा केला आहे. यामुळे काही लोकांची भाषांतरें सोडून वाचिलों पाहिजेत. असे लोक जेथें आहेत येथे लोकांच्या भाषां तरापुढे पूर्णविराम घातलेला नाहीं. तथापि काही झाले तरी भाषांतर ते भाषांतरच, हे विसरता कामा नये. गीतेचा सरळ, उत्तान व मुख्य अर्थ भाषांतरांत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे खरा; पण संस्कृत शब्दांत, व विशेषतः भगवंताच्या प्रेमळ, रसाळ, व्यापक आणि "प्रतिक्षण नवीच रुचि " देणाऱ्या वाणत, लक्षणेने अनेक व्यंग्यार्थ उत्पन्न करण्याचें जें सामर्थ्य आहे किचित् कमीजास्त न होतां दुसया शब्दांनी जसेच्या तसेच भाषांतरांत आणणे अशक्य आहे; अर्थात् संस्कृत भाषा जाणणारा पुरुष गीततील लोकांचा लक्षणेने अनेक प्रसंगी जसा उपयोग करील, तसा गीतेचे नुस्ते भाषान्तर वाचणाऱ्या पुरुषाल करितां यावयाचा नाही. किंबहुना तो चुकण्यायाहि पुष्कळ संभव असतो. यासाठी शक्य असेल स्थानें मूळ गीतामंथाचें संस्कृतांत अध्ययन केल्याखेरीज राहूं नये, अशी