पान:Geeta Rahasya BG Tilak.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात. ज्ञानाने आणि श्रद्धेनें, पण त्यांतल्या त्यांतहि विशेषकरून भक्तीच्या सुलभ राजमार्गानें, बुद्धि होईल तिसकी सम करून प्रत्येकानें लोक- संग्रहार्थ स्वधर्माप्रमाणे आपआपली कर्मे निष्काम बुद्धीने आमरणान्त करीत रहाणे हेच त्याचे परम कर्तव्य असून, त्यांतच त्याचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण आहे, मोक्षप्राप्तीसाठी कर्मे सोडण्याची किंवा दुसरे कोणतेही अनुष्ठान करण्याची जरूर नाहीं, हा सर्व गीताशास्त्राचा फलितार्थ होय, हे गीतारहस्यांत प्रकरणशः सविस्तर प्रतिपादन केले आहे. तसेंच या धोरणाने गीतेच्या अठरा अध्यायांची संगति सरळ कशी लागध्ये, आणि या कर्मयोगपर गीताधर्मीत इतर मोक्षसाधनांतील कोणकोणते भाग कस- कसे आले आहेत, हेंहि तेथेंच चवदाव्या प्रकरणांत दाखविले आहे. इतका ऊहापोह झाल्यावर वास्तविक म्हटले म्हणजे गीतेच्या लोकांचा आमच्या मताप्रमाणे कमश: प्राकृतांत सरळ अर्थ सांगण्यापलीकडे कांहीं जास्त काम रहात नाही. परंतु गीतेच्या दरएक अध्यायांतील विषयाचे विभाग कसे केले आहेत ते सांगणे, किंवा कांही विशिष्ट लोकांतील पदांची टीकाकार स्वसंप्रदायसिद्धार्थ कशी ओढाताण करितात हे दाखविणे, गीता- रहस्यांतील सामान्य विवेचनांत शक्य नव्हते. म्हणून या दोन्ही गोष्टींचा विचार करून पूर्वापर संबंबहि जेथल्या तेथेंच नीट लक्षांत येण्यासाठीं भाषान्तराला जोडून टीकेच्या रूपाने कोही टीपा देणे जरूर पडले. तथापि जे विषय गीतारहस्त्रांत सविस्तर वर्णन केलेले आहेत त्यांचे फक्त दिग्दर्शन करून गीतारहस्याच्या ज्या प्रकरणांत त्या विषयाचा विचार केलेला आहे त्यास हवाला दिला आहे. या सर्व टीपा मूळ ग्रंथाहून निराळ्या ओळ- खितां याध्या म्हणून त्यांच्या भोवती [ असे चौकोनी कंस घातले असून मागे उभी तुटकी रेघ आहे. लोकांचे भाषांतर होईल तितकें शब्दश: