पान:Geeta Rahasya BG Tilak.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात. सर्वांस आमची आग्रहपूर्वक विनंति आहे; व भाषांतराबरोबरच मूळ लोक देण्याचे एक कारण हेच होय. गतेिच्या प्रत्येक अध्यायांतील विषयाचा बोध होण्यास सोयीचे पढावे म्हणून या सर्व विषयांची अध्यायवार लोकश: अनुक्रमणिका, वेदांतसूत्रांच्या अधिकरणमालेच्या धर्तीवर प्रथम निराळो दिली आहे. प्रत्येक श्लोक पृथक् पृथक् न वाचितां अनुक्रमणिकेच्या या धोरणामें गीतेतील श्लोक एकत्र करूम वाचिल्यास गीतेच्या ताब प्रस्तुतचा गैरसमज पुष्कळांशी दूर होईल. कारण सांप्रदायिक टीकाकारांनी गीर्ततकि श्लोकांची ओढाताण करून आपल्या संप्रदायाच्या सिद्धयर्थ कांहीं लोकांची जी अर्थातरे दिली आहेत ती प्रायः मा पूर्वापार संदर्भाकडे दुर्लक्ष करून केलेली आहेत. उदाहरणार्थ, गी. ३,१९,६३१८२ पड़ा. अशा दृष्टीने पाहिले तर गीतेचे हे भाषांतर व गीतारहस्य या परस्परांच्या पुरवण्या आहेत असे म्हणण्यास हरकत नाही; व ज्याला आमचें म्हणणे काय आहे हे पूर्णपणे समजून घेणे असेल, त्याने हे दोन्ही भाग पाहिले पाहिजेत. भगवद्गीताग्रंथ तोंडपाठ करण्याचा प्रघात असल्यामुळे त्यांत महत्वाची पाठांतरें कोटेंच आढळून येत नाहीत. तथापि गीतेवरील सध्या उपलब्ध होणाऱ्या मापांपैकी अतिप्राचीन जे शांकरभाष्य त्यांस दिलेले पाठच आम्ही प्रमाण घरिलेले आहेत, हे येथे सागणे जरूर आहे.