पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


৩৪ आईबापांचा मित्र. असें यावरून उघड होतें. विवाहास गुरूची आज्ञा पाहिजे, पण विवाह गुरूनें करावयाचा नाहीं; तो बापानें करावा, असाही या श्वठोकांत उल्लेख नाहीं. ३ जेव्हां गुरूच्या गृहीं राहून विद्या करावी, या गोष्टीचा लोप झाला; व गुरूवर असणारा विद्येचा भार नाहींसा होऊन ती बापावर पडला, तेव्हां कोठे कोठे बापाकडे गुरुत्वही आलें, हें मागें सांगितलेंच आहे. त्यामुळे गुरूच्या आज्ञेच्या ठिकाणीं बापाची आज्ञा घेण्याची वेळ आली, व त्यामुळे पुढे पुढे बापच मुलाचा विवाह करूं लागला. ४ पेशवाईत श्रीर्मत लोकांत लहानपणीं लग्न करण्याची चाल अधिक रूढ झाली असावी, व तिचें अनुकरण हळू हळू इतर लीकांत झालें असावें, असें वाटतें. एक दोन पिढ्यांच्या पूर्वी पुष्कळ पुरुषांचीं लझें थोरपणीं होत, व पुष्कळ पुरुष अविवाहित राहात. अलीकडे मुलांचीं लमें फार लोकर होत नाहींत, मुली साधारण मोठ्या होतात; लमें होतांच त्यांला बहुधा ऋतुप्राप्ति होते व समाजांत अविवाहित फारसा कोणी राहात नाहीं. ५ हल्लीं ज्याप्रमाणें मुलीच्या लग्नाची काळजी बापास असते, त्याप्रमाणे-थोड्या कमी प्रमाणानें-मुलाच्या बापास मुलाच्या लग्नाविषयींही काळजी वाटत असते. यामुळे हल्लीं बहुतेक मुलांमुलींचे विवाह आईबापांनींच करावयाचे, असें बहुतेक ठाम ठरल्यासारखें झालें आहे. याला थोडाबहुत अपवाद दृष्टीस पडतो, नाहीं असें नाहीं, पण त्याचे प्रमाण मोठे नाहीं. विद्या होईपर्यंत तरी विद्याथ्र्यानीं अविवाहित राहावें, असें हल्लीं कित्येकांस वाटू लागलें आहे, पण त्याचा परिणाम समाजावर फारसा झालेला दिसत नाहीं. बराचसा हुंडा मिळाला म्हणजे ब-याच जणांची धांदल उडते, व विवाह उरकून घेण्यांत येतो. आनीबीझांटबाईच्या बनारस येथील कालेजांत विवाहितांस घेत नाहीत, व हल्लीं बंद झालेल्या समर्थविद्यालयांत विवाहितांस घेत नसत असें ऐकिवांत अहेि. अविवाहित राहाण्याकडे पुष्कळांचा कल व्हावा, याकरितां