पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग चवथा. ৩৫ प्रयल, आप ल्याकडून जितके होणे शक्य असतील, तितके आपण अवश्य करावे. म्हणजे आपण आईबापांनीं मुलांसंबंधीं बजावण्याची कामगिरी यथास्थित बजावली, असें होईल. याकरितां मुलांच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाची नीट व्यवस्था, आपल्या हातून होईल तेवढी बजावण्याचा, आईबापांनीं प्रयत्न करावा. भाग ४-विवाह, १ आईबापांनीं मुलांस वाढवावें, त्यांस शिकवून तयार करावें, त्यांस एखाद्या धंद्याचे शिक्षण द्यावें, हें सर्व चांगलें आहे; पण त्यांचा विवाह आईबापांनीं करावा किंवा नाहीं, हा मोठा प्रश्न आहे. प्रश्न तर खराच. दोन्ही बाजूंला पुष्कळ कारणें दाखवितां येतील. दोन्ही प्रकारांत नफेतोटे आहेतच, पण आपल्या समाजांत ही चाल रूढ कां झाली, याचा आपण थोडासा विचार करूं. प्रत्येकानें परिस्थितीकडे लक्ष दिल्यास व सारासार विचार केल्यास, हा प्रश्न आपल्यास मोठी नड करील असें नाहीं. २ मुलांचीं लमें करण्याबद्दल धर्मशास्राचे काय मत आहे, तें आपण प्रथम पाहूं. विद्याथ्र्यानें विद्या पुरी झाल्यावर गुरूच्या आज्ञेनें विवाह करावा, असें मनुस्मृतींत सांगितले आहे, पुढील श्वठीक पाहा: गुरुणानुमतः स्रात्वा समावृत्तो यथाविधि । उद्धहेत द्विजो भार्या सवणी लक्षणान्विताम् ॥ मनु.-अ. ३ लो. ४ “ब्रह्मचारी द्विजानें गुरूच्या अनुमतीनें यथाविधि ( आपला ) समावर्तनविधि करून आपल्या वर्णातील शुभ लक्षणांनी युक्त अशी स्री वरावी.?? या श्लोकावरून विवाहास गुरूची आज्ञा पाहिजे, हें उघड दिसतें. विवाहाच्या पूर्वी सर्व विद्या संपली पाहिजे, निदान विद्येचा काळ तरी संपला पाहिजे, असें उघड दिसतें; पण विवाह ज्याचा ह्यानें करावा,