पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग चवथा- ; ৩৩ विवेकानंदासारख्यांनी पुष्कळ श्रम केले आहेत; पण अद्याप या गोष्टीला विशेष यश आलेलें नाहीं. ६ मुलांच्या लझाविषयीं धर्मशास्राचे मत आपण पाहिलें. मुलींच्या लग्नाविषयीं त्याचे मत काय आहे, तें आतां पाहूं. स्रीनें खातंत्र्यानें राहूं नये, कोणाच्यातरी आश्रयानें राहावें, असें पुढील श्वलोकांत सांगितलें आहे. बाल्ये पितुर्वशे तिष्ठेत्पाणिग्राहस्य यौवने । पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत्ख्ञी स्वतंत्रताम्॥ मनु.-अ. ५ ली. १४८. “स्त्रियेनें बाल्यावस्थेत पिल्याचे आधीन राहावें. तारुण्यावस्थेत भल्यांच्या आधीन राहावें, भर्ता मृत असतां पुत्रांचे आधीन राहावें. (पुत्रांच्या अभावीं सपिंड बांधवांच्या आधीन राहावें. त्यांच्या अभावी आपल्या पितृपक्षाच्या आधीन राहावें, भर्तृपक्ष व पितृपक्ष या दोहोंच्या अभावीं राजाच्या आधीन राहावें,) कदापि खातंत्र्यानें राहूं नये.” ७ दुसरा लोक ‘न स्री स्वातंत्र्यमर्हति' स्रीला खतंत्रपणा योग्य नाहीं असा आहे. यावरून मुलीचा विवाह करणें हें बापाच्या कर्तव्यांपैकी एक कर्तव्य ठरलें. कारण, मुलीला लहानपणीं बापानें रक्षावयाचे, व तरुणपणीं तिला भल्यांच्या स्वाधीन करावयाचें, यामुळे तिचें लग्न करणें हें सहजच त्याचे कर्तव्य झालें. ऋतुप्राप्तीनंतर विवाह करणें अप्रशस्त व धर्मबाह्य ठरल्यामुळे, तिचे लग्न लहानपणीं करणें अगत्याचें होऊन बसलें. मुलीचे लग्न करावयाचे म्हणजे तिला वर शोधिलाच पाहिजे. मुलांचीं लमें बाप मागें सांगितल्याप्रमाणे आपल्या विचारानें करूं लागले. याकरितां मुलांमुलींचीं लमें करणें हें एक आईबापांचें कर्तव्य होऊन बसलें. ८ लग्नाशिवाय मुलगी राहाणें ठीक नाहीं, असे वाटू लागल्यामुळे, व मुलीस चांगलें स्थळ मिळावें या बापाच्या अनिवार इच्छेनें, पुढे पुढे हुंड्याचे दर आपोआप वाढत चालले. समाजांत मुली