पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ आईबापांचा मित्र. फायदेशीर होणार नाहीं. याकरितां आईबापांनीं या गोष्टीचा नीट विचार करावा. १७ शाळांतील-अथांतू सरकारी शाळांतील-शिक्षण नियमांप्रमाणे-अर्थात् सरकारानें ठरविलेल्या नियमांप्रमाणे-चालणार, हें उघड आहे. पण ते नियम आपणांस योग्य वाटतील, तसे आईबापांस करून घेतां येतील. त्यांत ज्या उणीवा किंवा दोष असतील, त्यांबदृल सरकारची खात्री केल्यास, सरकार त्याबद्दल विचार केल्याशिवाय राहाणार नाहीं. घरीं शिक्षक ठेवण्याचा प्रसंग टाळतां येईल तितका चांगला. घरीं शिक्षक ठेवल्यास मुलांचे खावलंबन नाहीसें होतें. ती सर्व अभ्यास घरच्या शिक्षकापासून तयार करून घेतात, खतः कांहींच करीनाशीं होतात; व आयल्या पिठावर रेघा ओढणाच्या मनुष्यांप्रमाणे त्यांची स्थिति होते. घरच्या शिक्षकानें दिलेलें शिक्षण शाळेतल्या शिक्षणाशीं जुळतें असल्यास, दुप्पट शिक्षण झालें नाहीं, तरी होईल तें शिक्षण दृढ तरी होईल, पण त्यांचे शिक्षण एकमेकांशीं मिळतें नसल्यास, ‘मांजरांचे होतें भांडण पण उंदराचा जातो जीव’ त्याप्रमाणे शिक्षकांची आपल्या ज्ञानावद्दलची बढाई, विद्याथ्यांच्या गळ्यास फांस लावृं. लागावयाची ! घरच्या मास्तरानें सांगावें, त्याचा मेळ शाळेतल्या मास्तराच्या सांगण्याशीं पडावयाचा नाहीं, व शाळेतल्या मास्तरानें सांगावें, त्याचा मेळ घरच्या मास्तराच्या सांगण्याशीं पडावयाचा नाहीं, असें पुष्कळ वेळ होतें. जगांत उपयुक्त ज्ञान कांहीं थोडें नाहीं. इतकेंचसें काय पण उपयुक्त नाहीं, असें ज्ञानच नाहीं. तरीपण मुलांची प्रहणशक्ति पाहून व परिस्थिति मनांत आणून, त्यांतलें कोणतें ज्ञान किती द्यावयाचे याचा विचार करावा. दोघांचे शिक्षण दोन प्रकारचे असल्यास, ज्याप्रमाणें दोन बाजूंनीं दोन शक्तींचा समान दाब लागल्यास, पदार्थ जागच्या जागींच राहतो, किंवा नि:शक्त बनतो, त्याप्रमाणें दोन शिक्षकांचे शिक्षण एकमेकांच्या विरुद्ध असल्यास, विद्याथ्यांच्या हातांत त्यांतलें मुळींच कांहीं न