पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ६५ लागण्याचाही संभव आहे ! याकरितां होतां होई तों खासगी शिक्षक ठेवू नये, हें चांगलें. १८ पुष्कळ आईबापांस अशी संवय असते की, मुलें शाळेतून. आलेली दिसलीं, की त्यांनी त्यांना दिलेंच कांहीं तरी काम लावून ! हें करणें चांगलें की वाईट, हें सांगितलेल्या कामावर अवलंबून आहे. मुलें शाळेतून आलीं म्हणजे तीं थकून भागून आली आहेत, हें मनांत ठेवून, त्यांस विशेष त्रास होणार नाही अशी काळजी मनांत बाळगून, फुरसतीच्या वेळीं सहज होणारीं कामें, किंवा त्यांस करमणूक होणारी कामें, किंवा त्यांच्या शरीरास वेगळा व्यायाम देणारी कामें, सांगितल्यास हरकत नाही. पण त्यांच्या थकलेल्या मनास अधिक थकवतील, किंवा त्यांच्या नेत्रादिकांस त्यांपासून अधिक त्रास होईल, अशीं कामें त्यांस सांगूं नयेत. त्याप्रमाणेच, शाळेतील अभ्यासाची तयारी करण्यास मुलांस कांहीं वेळ हवा असतो, तो त्यांचा वेळ न आडवणें चांगलें. कारण त्यांस योग्य तेवढा वेळ मिळाला नाहीं, म्हणजे त्यांचा शाळेतला अभ्यास नीट होणार नाहीं; शाळेतला अभ्यास नीट झाला नाहीं, म्हणजे तीं मागें राहून त्यांस शाळेत जावेंसें वाटणार नाहीं; हळूहळू त्यांचे अभ्यासावरचे लक्ष उडेल, तीं अभ्यासांत मागें राहातील, व त्यांस शाळेचा कंटाळा येईल. १९ कितीएक आईबाप, मुलांस शाळेत लागणाच्या सामानाची व्यवस्था नीट लावीत नाहीत, पण हें बरोबर नाहीं. मुलांस वाचनपुस्तक नसेल, तर त्यांचे वाचन तयार कसें होईल ? कागद नसतील, तर सांगितलेल्या गोष्टींचे त्यांस टिपण कसें करितां येईल ? मुलांस सामुग्रीचा पुरवठा पूर्ण असावा. अमुक नाहीं म्हणून हा माझा अभ्यास तयार झाला नाहीं, अशी तक्रार मुलांस करावयास सांपडणे चांगलें नाहीं. दिवसेंदिवस शिक्षणाचे विषय वाढल्यामुळे, व शिक्षणाची पद्धति बदलल्यामुळे, मुलांस साहित्य फार लागतें, हें खरें, पण तें ह्यांस आईबापांनी न पुरविल्यास, मुलांचे शिक्षणांत तेवढा व्यत्यय आल्याशिवाय राहाणार नाहीं. जें सामान