पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ६३ः अशा फावल्या वेळांत, इतर विद्या म्हणजे सुतारकाम, लोहारकाम, कातकाम, इत्यादि प्रकारचे स्रायूंस व्यायामाप्रमाणें उपयोगीं पडणारें काम, शिकण्याची सोय असेल, त्या ठिकाणीं तें काम मुलांस शिकविल्यास अधिक फायदेशीर होईल; कारण त्यापासून व्यायाम होऊन, एखादी कलाही थोडीबहुत माहीत होण्याचा संभव असतो. १६ हल्लींच्या शाळांत शिकवीत नाहीत, अशा कांहीं गोष्टी शिकविण्याकरितां, घरीं शिक्षक ठेवल्यास हरकत नाहीं. पण तो ठेवतांनाही आईबापांनीं पुष्कळ विचार करावा. जें शिक्षण मुलांस द्यावें असें आपल्यास वाटतें, तें मुलांच्या प्रकृतीस झेंपण्यासारखें आहे किंवा नाही, त्यापासून त्यांच्या प्रकृतीस इजा होईल की काय, त्याचा त्यांस कितीसा उपयोग होईल, त्यानें शाळेतल्या शिक्षणास अडचण येईल की काय, तें शाळेतल्या शिक्षणाशीं विरुद्ध होईल की काय, याचा आईबापांनीं विचार करावा. तें शाळेच्या शिक्षणापैकीच असलें, तर त्यांच्या बुद्धीस उगाच शीण देण्यांत अर्थ नाहीं. कारण तें शिक्षण दोन्ही ठिकाणचें सारखेंच असल्यास, त्यांपेकीं एकाकडे मुलांचे लक्ष लागेल व एकाकडे लागणार नाहीं. कारण जें शाळेत शिकावयाचे, तें घरी तयार झाल्यास, त्यांचे लक्ष शाळेतील शिक्षणाकडे लागणार नाहीं, उलट प्रकार झाल्यास, घरच्या शिक्षणाकडे लागणार नाहीं. ज्ञानाचा सागर भरलेला आहे. त्यांतलें ज्ञान मुलांच्या हातीं लागेल तेवढे थोडेंच आहे. हें जरी खरें आहे, तरी मुलांची ताकद किती आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांच्या ताकदीबाहेर शिक्षण त्यांच्यांत कोंबण्याचा प्रयत्न केल्यास, तें मावणार नाहीं. पोहरा पाण्यांत चार वेळ बुडविल्यानें, त्यांत चौपट पाणी मावणार नाहीं. एकवेळ भरलेला कोठे रिकामा करितां आल्यास गोष्ट वेगळी! पोट भरल्यावर जेवण जेवल्यास, तें बाधल्याशिवाय राहाणार नाहीं. विस्तवावर एकदम पुष्कळ जळवण दडपल्यास, तो पेटण्याच्या ऐवजीं मंदावण्याचा पुष्कळ संभव आहे, त्याप्रमाणेच शाळेतलें शिक्षण मुलांच्या पचनी पडल्याशिवाय, ह्यांस दुसरें शिक्षण देणें