पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ६१ अगल्याचे आहे. मात्र त्यांतल्या उणीवी स्पष्ट व योग्यरीतीनें आपण सरकारच्या दृष्टीस आणाव्या. याकरितां खटपट करतांना कंटाळू नये. १२ काळ नेहमीं बदलत असतो. त्याप्रमाणे सर्व गोष्टी बदलत असतात. आम्ही तात्यापंतोजीच्या शाळेत शिकलों, त्या शाळा आतां नाहींशा झाल्या. आतां ज्या शाळा आहेत, त्यांत आम्हांस कांहीं फरक हवासा वाटला, म्हणून त्यांत कांहीं नवल नाहीं. तो कालमहिमा आहे. तो कोणास टाळतां यावयाचा नाहीं. आतां ज्या शाळा आहेत, त्यांचे धोरण काय आहे, त्यांत बरें वाईट काय आहे, त्या परिस्थितीला धरून आहेत किंवा सोडून आहेत, याचा विचार आईबापांनीं करावा. त्यांत बदल करावा असें त्यांस वाटत असेल, तर त्यांनीं तसा बदल सरकारच्या विचारानें करून घ्यावा; किंवा खासगी संस्था काढून त्या चांगल्या चालवून, आपण म्हणतों त्याचा प्रत्यय लोकांस व सरकारास दाखवावा. १३ फार प्राचीन काळीं मुलांचा व गुरूंचा नित्य संबंध असे, हें मागें सांगितलेंच आहे. असा संबंध असणें फार अगल्याचें आहे. इंग्लडांतील पुष्कळ शहरांत अशा शाळा हल्लीं आहेत. आपल्या इकडेही कांहीं मोठ्या शहरी व जिल्ह्याच्या ठिकाणीं, अलीकडे खासगी संस्थांनी व सरकारानें, अशाप्रकारचे प्रयत्न थोडथोडे सुरू केले आहेत. पण अशा संस्था सर्वत्र होणें तूर्त तरी कठीण आहे. याकरितां, प्रथम हल्लीं असलेल्या शाळांतच होईल तेवढी सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे इष्ट आहे. आपल्याकडील शाळांत जाँ मुलें जातात, त्यांतील बहुतेक आईबापांच्या जवळ असतात, त्यांच्यावर देखरेख करण्याचे काम आईबापांनीं मनापासून केल्यास, त्यांच्या मनाप्रमाणें बच्याच गोष्टी घडून येतील. सर्वप्रकारचें शिक्षण शाळेत व्हावें, किंवा मुलें गुरूंच्या सहवासांत अक्षय असावी, असें आपल्यास वाटत असल्यास, ज्यांवर शिक्षकांची देखरेख अक्षय राहील, अशाप्रकारच्या शाळांचा प्रसार अधिक करण्यास झटावें; नाहींतर असलेल्या शाळाच कायम आहेत, ६