पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ आईबापांचा मित्र. तोंपर्यंत मधल्या वेळांत मुलांवर देखरेख करण्याचे काम, त्यांनीं पतकरावें. १४ आपल्यावरील ही जबाबदारी थोडीबहुत कमी करण्याच्या इराद्यानें,श्रीमंत गृहस्थ आपल्या मुलांस शिकवण्याकरितां, घरीं वेगळे शिक्षक ठेवून देतात, पण इतक्यानें सर्व काम भागत नाही. कारण ज्यांस सामथ्यै नाहीं, त्यांची सोय यांत होत नाहीं. याकरितां, खासगी शिक्षक ठेवून आपली मात्र सोय करून घेण्यापेक्षां-केवळ आपलाच स्वार्थ साधण्यापेक्षां-सार्वजनिक शिक्षण सुधारण्याकरितां लागेल ती मेहनत करणें, अधिक महत्वाचे आहे. सार्वजनिक शिक्षण सुधारल्यानें व्यक्तिमात्राला फायदा होईल, व अशा कामांत श्रीमंतांनीं लक्ष घातल्यास, त्यांचा लौकिक होऊन सर्व समाजाचे हित होईल. १५ शाळेतील शिक्षण व्यवस्थित चालेल, तर घरीं शिक्षक ठेवण्याची जरूरी कोणासही भासणार नाहीं. मुलांचा शाळेतला वेळ शिक्षणांत जात असेल, तर त्यांचा शाळेबाहेरचा वेळ शिक्षणांत गेला नाहीं तरी चालेल. इतकेंच नव्हे, तर तो शिक्षणांत घालविण्यांतही फारसा फायदा होणार नाहीं, किंबहुना तोटा होईल. मुलांस एकसारखें शाळेत अडकवून ठेवणें चांगलें नाहीं, तसेंच त्यांस एकसारखें शिक्षणांत गुंतवून ठेवणेही चांगलें नाहीं. सुतारानें कांहीं वेळ काम केल्यावर, कांहीं वेळ हत्यारें पाजवण्यांत घालविणें जसें चांगलें असतें, तसे मुलांनीं शाळेत एकसारखे पांच सहा तास शिक्षणांत घालविल्यावर, त्यांसही थोडीबहुत विश्रांति मिळणें हिताचे असतें. याकरितां त्यांचा घरचा वेळ शिक्षणांत गुंतविणें चांगलें नाही. त्या वेळेचा व्यय मुलांस त्यांच्या इच्छेप्रमाणे करूं द्यावा. मात्र भलल्या गोष्टी यांनीं करूं नयेत, इकडे लक्ष असावें. खेळण्यापासून मुलांच्या प्रकृतीस हित होतें, याकरितां शारीरिक खेळांत तो वेळ लयांनी घालविल्यास, त्याबद्दल मनाई करण्याचे कारण नाहीं; मात्र त्यांच्या खेळापासून त्यांस किंवा इतरांस अपाय न होईल, इतकी खबरदारी घेण्याची व्यवस्था ठेवावी. ज्या ठिकाणीं