पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૬૦ आईबापांचा मित्र. १० मुलें शाळेत जातात व शिकतात, इतक्याच गोष्टीनें त्यांनीं समाधान मानून घेऊं नये. तीं शाळेत काय शिकतात, कसें शिकतात, जें शिक्षण त्यांस मिळत आहे, तें किती योग्यतेचें आहे, त्यांत कांहीं फरक करावयास पाहिजे किंवा कसें, याचा तपास त्यांनीं ठेवावा. मुलें अापला शाळेबाहेरचा वेळ कसा घालवितात, त्यांचे वर्तन कसें आहे, त्यांचा स्नेहसंबंध कोणत्या मुलांशीं आहे, तीं मुलें कशीं आहेत, त्यांची वागणूक शाळेत व बाहेर कशी आहे, इत्यादि गोष्टींचाही तपास त्यांनीं ठेवावा. मुलांचा शिक्षकांशीं फार थोडा संबंध असल्यामुळे, त्यांचे दुर्गुण किंवा वाईट खभाव, शिक्षकांस समजून येण्याचा संभव कमी असतो. पण अाईबापांनीं लक्ष ठेवल्यास, प्रयास न पडतां त्यांस ते समजतील, व वेळेवर त्यांचे निर्मूलनही त्यांस करतां येईल. कोणताही दुर्गुण वाढला नाहीं, फारसा चिकटला नाहीं, तोंच त्याची झाडणी करणें इष्ट असतें. मुलांचा दुर्गुण दृष्टोत्पत्तीस आल्यास तो झांकून ठेवू नये. बोभाटा न करितां, तो नाहींसा करण्याकरितां सामोपचाराचे उपाय प्रथम योजावे. जरूर वाटल्यास शिक्षकांचीही मदत त्या कामांत घ्यावी. परंतु मुलें शाळेत जात आहेत, त्यांच्याकडे पाहाण्याचे आपणांस कारण नाहीं, असें मनांत आणून खस्थ कधींही बसू नये, त्यापासून आपल्या संततीचें जन्माचे नुकसान होईल व त्यांस जन्मभर पश्चात्ताप करावा लागेल. ११ शाळेत मुलांचे शिक्षण कसें चालतें, हें पाहाण्याकरितां त्यांनीं वारंवार शाळेत जावें; शिक्षकांची गांठ घ्यावी; शिक्षणांत उणीवा दिसल्यास, शिक्षकांच्या साह्यानें त्या काढून टाकण्याचा प्रयत्न करावा; शिक्षण चाललें आहे, तें सोईवार नाहीं; त्यापासून आपल्या संततीस उपयोग होत नाहीं; असें वाटल्यास तें असावें कसे, तसे शिक्षण मिळण्यास काय तजविजी केल्या पाहिजेत, याचा त्यांनी पूर्ण विचार करावा; व तसें शिक्षण शाळांतून चालावें, याकरितां योग्य ती खटपट करावी. शाळा सरकारानें चालविल्या असल्या, तरी त्यांतलें शिक्षण लोकमताप्रमाणें ठेवणे, सरकारासही