पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ आईबापांचा मित्र. ३६ मुलांस वागवितांना आपण हीच गोष्ट मुख्य लक्षांत ठेवावी. मुलें आपणांस प्रेम करण्याकरितां मिळाली आहेत. ती ईश्वराची अमूल्य देणगी आहे. ज्यांस मुलें नसतात, त्यांस संसार असार भासतो. मग ज्यांस तीं ईश्वराच्या कृपेनें मिळालीं आहेत, त्यांनी त्यांवर प्रेम कां करूं नये ? त्यांच्यावर प्रेम केल्यानें, वरील उताच्यांत सांगितलेल्या असंख्य गोष्टींचा लाभ आपणांस सहज होईल व आपल्यावर ईश्वराची कृपाही सहज होईल. मुलांचे दुर्गुण झाडून टाकण्यास, होईल तेवढा प्रेमाचा उपयोग आपण करावा. ३७ लयांस प्रेमळ बनवितां येईल तितकें चांगलें. कारण तीं जगांतं प्रेमाची वृद्धि करणारी व्हावीं, हें सगळ्यांच्या हिताचे आहे. निरुपाय झाल्यास त्यांजवर रागवावें व देहदंडही करावा, पण तो कशाकरितां, तर केवळ प्रेमतरूची लागवड़ करण्याकरितां. जमीन भाजल्यावर सुपीक होते, त्याप्रमाणे योग्यवेळीं दाखविलेला राग किंवा केलेली शिक्षा, मुलांच्या अंत:करणांत प्रेमतरूची लागवड करण्यास उपयोगीं पडेल. त्यांस समजत नाहीं, असें आढळल्यास, त्यांच्याबद्दल आपल्यास अधिक दया आली पाहिजे, अधिक वाईट वाटलें पाहिजे, व त्यांच्यावर अधिक प्रेमदृष्टि ठेवून, त्यांस शिकवण्याकरितां अधिक कष्ट करण्याकडे आपली प्रवृत्ति झाली पाहिजे. ३८ आपल्या प्रेमास ती कशीं पात्र होतील, राष्ट्राच्या प्रेमास तीं कशीं पात्र होतील, व अखेर जगन्नियंत्या मंगलधाम ईश्वराच्या प्रेमास ती कशीं पात्र होतील, या गोष्टींचा विचार करून, प्रेमळ वागणूक ठेवून, आपण त्यांस हळू हळू उच मार्गावर चढवीत नेलें पाहिजे. ह्या कामाबद्दल मोबदल्याची इच्छा आईबापांनीं ठेवू नये. मुलें पुढे आपल्या उपयोगी पडतील, ह्या भावनेनें या गोष्टी करावयाच्या नाहीत, आपलें कर्तव्य झणून करावयाच्या आहेत, हैं घूर्ण लक्षांत ठेवावें. आपल्यास संतति प्राप्त झाली, हा आपल्यावर परमेश्वराचा प्रसाद आहे, त्यापासून हें कर्तव्य उत्पन्न झालें आहे, आपण आपलें कर्तव्य योग्यरीतीनें बजाबलें, ह्मणजे तें वांयां जाणार नाही. त्याचा मोबदला आ॥५ख्यtस मिळाख्याशिवाय