पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग दुसरा- 8 ३४ आपण संततीवर प्रेम केल्यास, संततीच्या मनांत प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाहीं. प्रेमाचा आरंभ आईबापांनीं करावा, हें विहित आहे; व तें वाढीसही त्यांनींच लावावें. प्रेमाचे वर्णन संस्कृत व इंग्रजी ग्रंथांतही पुष्कळ केलें आहे. कवींचे तर तें दैवतच आहे. संस्कृतांतील मासला पाहा:‘सखि साहजिकं प्रेम दूरादपि विराजते' प्रेमाला वतु जवळ असावी लागत नाही. ती दूर असली तरी प्रेमाला अडचण येत नाहीं. तसेंच आईबापांचे मुलांवर किती प्रेम असतें हें ‘न चापल्यसमः स्नेह:’ अपल्यासारखा स्नेह नाहीं, या वाक्यावरून उघड होण्यासारखें आहे. मनुष्याचे आपल्या अपल्यावर प्रेम फार असतें, ह्मणून तर प्रखेकाला आपलें अपल्य कसेंही असलें तरी, तें सुंदर वाटतें. प्रेमानें वस्तूला नवें रूप प्राप्त होतें. ‘अमृतं बालभाषणं’ याचे कारण तरी प्रेमच. अपत्यांवर आपलें जें प्रेम असतें, तें इतकें अनिवार असतें कीं, मुलांचे भाषण कसेंही असो, तें आपल्यास गोड वाटतें. याकरितां आपण आपल्या मुलांशीं वागतांना प्रेमाची वागणूक ठेवावी. ३५ आतां एका इंग्रजी पुस्तकांतील प्रेमवर्णनाचा मासला पाहा:-“प्रेमानें मनुष्यांचीं मनें निर्मळ होऊन ती एकत्र जमतात. त्यांची कठोर वृत्ति नाहींशी होऊन तीं एकमेकांवर ममता करतात. शत्रुत्व नष्ट होऊन ती मित्र होतात. प्रेम हा सज्जनांचा आनंद, शहाण्यांचें नवल, व देवांचे कौतुक होय. तें सर्वोस हवेंसें असून साध्य झालें ह्मणजे मोलानें आगळे भासतें. प्रेम हें कोमलता, मार्दव, आराम, इच्छा, ममता, व सौंदर्य या गुणांचे जनक होय. जेवढे चांगलें तेवढे घेऊन, प्रेम वाइटाचा त्याग करितें. प्रखेक भाषणांत, कृतीत, इच्छेत, तें आपला मार्गदर्शक होऊन, आपलें संरक्षण करितें. तें देवांचे व मनुष्यांचे वैभव असून, आपलें सर्वोचे मार्गदर्शक असतें. ह्यानें दाखविलेल्या मार्गानें सर्वीनी जावें हें इष्ट होय.” कर्तव्यसुख-पृष्ठ २००