पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा- 3WS राहाणार नाहीं, पण आपली दृष्टि मोबदल्यावर गेल्यास शुद्ध प्रेमाचा आपल्यास विसर पडेल. मोबदल्याच्या मानाकडे आपलें लक्ष जाईल, व आपलें योग्य कर्तव्य योग्य रीतीनें आपल्या हातून पार पडणार नाहीं. याकरितां आपलें लक्ष खकर्तव्यावर ठेवावें, शुद्ध प्रेमावर ठेवावें, ह्मणजे त्यापासून आपल्या मनास फार समाधान वाटेल, व आपण आपलें कर्तव्य योग्यरीतीनें बजावू. ३९ कित्येक आईबापांस असें वाटतें की संततीवर आपले फार उपकार आहेत, ह्यणून संततीनें आपल्या अध्यी वचनांत वागावें. मुलांवर आईबापांचे उपकार नाहीत असें ह्मणून चालावयाचें नाहीं. पण उपकार असले ह्मणून काय झालें ? त्याबद्दल मोबदला घेण्याची इच्छा आपण केली, ह्मणजे उपकार केल्याचा मोठेपणा तेवढा कमी झाला. आईबापांच्या उपकरांची फेड होणें शक्य नाहीं, ह्यणूनच त्यांच्या मोबदल्याची इच्छा आपण करावयाची नाहीं. संततीस आईबापांनी केलेले उपकार पटले व त्यांनीं ते शक्य तेवढे फेडण्याचे प्रयत्न केले, तर उत्तमच. न केले तरी आईबापांनीं रागाचूं नये. आपण जे उपकार केले ते फेडीकरितां नव्हत, कर्तव्य ह्मणून केले. तसेच मुलांनीं आईबाप झाल्यावर आपल्या संततीवर करावे, ह्मणजे झालें. ४० संतती झाल्यापासून ती हातातोंडास येईपर्यंत, आईबापांनीं जे कष्ट केले ते मोठे आहेत, पण ते करतांना त्यांस जो आनंद झाला तो काय थोडा आहे ! ४१ कृष्णाच्या बाललीला आपण मोठ्या प्रेमानें ऐकतों, याचे कारण काय ! नवराबायकीचें परस्परांवरील प्रेम संतति प्राप्त झाल्यानें दुणावतें, संततीच्या अभावीं तें कमी होतें, हें कोणास ठाऊक नाहीं ! उरोरुंहादुद्गमितैः पयोभिरापूर्य केल्या निज़माख्यगर्भ । फूत्कृत्य मातुर्वेदने ह्रसन्तं तनूभवं पश्यति कोऽपि धन्यः ॥ १ मातेच्या स्तनांतून निघणारें दूध आपल्या तोंडांत घेऊन, आईच्या तोंडावर फू करून उडवणारें मूल जो बाप पाहातो तो धन्य होय !