पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


8 आईबापांचा मित्र. चरफडण्याचे कारण कळत नाहीं, तोंपर्यंत चरफडण्याचा उपयोग होत नाहीं; व कारण कळू लागल्यावर चरफडण्याशिवाय भागण्यासारखे असतें. याकरितां होतां होईतों तिरसटपणा न करितां, प्रेमानेंच सर्व गोष्टी साधण्याचा प्रयत्न करावा. आपण आपल्या मुलांशीं धुसफुस सुरू केल्यास, तीं तरी शांत कशीं बनतील ! जें काम चापट्या लगावून किंवा वाईट शब्द बोलून, अथवा रिकामी गर्जना करून, किलेक आईबाप करतात; तेंच काम प्रेमळ आईबाप आपल्या अपल्यांकडे एकप्रकारच्या प्रेमळ दृष्टीनें पाहून किंवा वेळेवर प्रेमशुष्क व करड्या दृष्टीनें पाहून, तडीस लावितात. ३२ गोड शब्दांनीं जें काम होण्यासारखें असेल, त्या ठिकाणीं कठोर शब्दांचा प्रयोग करूं नये. नुसत्या वक्रदृष्टीनें ज्या ठिकाणीं काम होण्यासारखें असेल, तेथे कुशब्दांचा वर्षाव किंवा छड्यांचा छमछमाट चालवू नये; पण या प्रयत्नांचा उपयोग होत नसेल तर देहदंड करण्यास भिउं नये. कारण चांगल्या रीतिभाती मुलांस लागाव्या, हें आपलें साध्य आहे. तें साधण्याकरितां जरूर तरमोठ्या कष्टानें-आपण देहदंड करण्यास तयार व्हावें. केवळ शस्रसंन्यास करून नेहमींच चालणार नाहीं, पण ती गोष्ट-देहदंड करण्याची-निरुपायानें स्वीकारावी, आनंदानें खीकारूं नये. ३३ प्रेम ही एक अजब वतु आहे. पण ती अमूर्त आहे. आपण दुसच्यावर प्रेम केल्यास तो आपल्यावर सहज प्रेम करूं लागतो. पण दोघांपैकी एकानेंही त्याची लागवड न केल्यास तें मुळीं मूळच धरीत नाहीं. प्रेम करावयाचें ह्मणजे तें केल्यापासून आपल्यास कांहीं खर्च होत नाहीं, किंवा त्याच्या खर्चानें प्रेमाच्या मांडवलांत कांहीं कमीपणा येत नाही. प्रेमाचा मोबदला आपल्यास प्रेमांत मिळाल्याशिवाय राहावयाचा नाहीं, पण न मिळाला तरी आपण त्याबद्दल उतावळे होऊं नये. मोबदल्याकडे लक्ष न दिल्यास तें अधिक चांगलें. मोबदल्याची इच्छा नसली, ह्मणजे प्रेमाच्या सवाईनें मोबदला मिळतो, असें आपल्या अनुभवास येईल.