पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


ද් आईबापांचा मित्र. सामभ्यै नसेल तर आपलें घरचे काम आपण करण्यांत हलकेपणा नाहीं. ऋतुमानाप्रमाणें लता कपडा न वापरतां एखादा डागिना अांगावर घातला, तर त्यापासून आरोग्याचे रक्षण होणार नाहीं. साध्या रीतीनें वागणें जेवढे साधेल तेवढे चांगलें. त्यापासून श्रीमंतासही मोठेपणाच येतो, मग गरिबास हलकेपणा कसा येईल ? प्रसंगीं दोन पैसे जवळ असल्यास त्यांचा जेवढा उपयोग होईल, तेवढा डागडागिन्यांचा उपयोग होणार नाही. कारण ‘आप करेसी काम व पदरी असे सो दाम’ आपण केलें असतां जसें काम होईल, तसें दुसच्यावर सोंपवून होणार नाही. त्याप्रमाणेंच जवळ असलेला पैसा जसा उपयोगीं पडेल, तसा डागडागिना उपयोगीं पडणार नाहीं. अधिक पैसा असल्यास त्यांतला थोडा बहुत डागिन्यांत घालण्यास हरकत नाहीं, पण सर्व पैसा डागिन्यांत कधींच गुंतवृं, नये. डागिन्यांतील पैसा केव्हांही वाढावयाचा नाहीं, उलट तो कमी मात्र होतो. याकरितां कांहीं पैसा जवळ असणे किंवा चांगल्या पेढीवर ठेवणें अधिक चांगलें. गरिबगुरिबांससुद्धां कांहीं पैसा संग्रह ठेवितांयावा,म्हणून सरकारानें सेव्हिग व्यांकेचे काम पोष्टाकडे दिलें आहे, त्याचा उपयोग ह्यांनी अवश्य करून घ्यावा. २ लोक आपल्यास गरीब म्हणतील, या धास्तीनें श्रीर्मती दाखविण्याचा प्रयत्न-सामथ्यै नसतां—किखेक करीत असतात, तें चांगलें नाहीं. कारण यापासून ते अधिक दरिद्री होतात व आपल्यावर रिकामीं संकटें ओढून आणतात. आपण गरीब असल्यास आपल्यास लोकांनी गरीब म्हटलें म्हणून बिघडलें काय ? उलट आपण गरीब आहों, हें समजून आपण वागल्यास आपल्यावर संकट कधींच येणार नाहँीं. ‘हांतरूण पाहून पाय पसरावे' अशी म्हण आहे. त्याप्रमाणे आपण आपला आदा पाहून खर्च करूं लागूं व खापासून आपली स्थिति निश्चयानें सुधारेल, पण आपण *"#ख्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास, आपण अधिकाधिक कजैबाजारी बर्नू व अधिकाधिक हीनावस्थेस जाऊन पोहोंचूं. खरोखर आपली हीनावस्था असल्यास, ती तशी नाही असे मानणें, किंवा