पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग पहिला, ९ ती कालमानानें झाली आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणें, चांगलें नाहीं. तिच्या विचारानें आपण आपल्यास खिन्न करून घेऊं नये, पण तिच्या प्रतिकाराचे प्रयत्न आपण एकसारखें करीत राहिलें पाहिजे. ती झांकून ठेवू नये, एखाद्या रोगाप्रमाणे उघडी ठेवावी, म्हणजे ती नाहींशी करण्याचे उपाय आपल्यास दिसू लागतील; किंवा शहाणे लोक योग्य उपाय आपल्यास दाखवतील. पुष्कळांस आपली खालावलेली स्थिति किंवा असलेली गरीबी, लोकांच्या लक्षांत येऊं नये असें वाटतें, पण तें बरोबर नाहीं. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या संततीचेही वारंवार नुकसान होतें; याकरितां आईबापांनीं या खोट्या श्रीमंतीस आपल्या मनांत बिलकूल थारा देऊँ नये. ३ रिकामीं भांडणे टाळावीं. १ हल्लींचा काळ खस्थतेचा आहे. म्हणजे हल्लीं लढाईचे प्रसंग फारसे येत नाहींत, दंगेधोपे अगदीं कमी आहेत, याचा फायदा घेऊन प्रखेकानें अापली स्थिति सुधारण्याचा प्रयत्न करावा. पण आमच्या लोकांची स्थिति चमत्कारिक दिसते, म्हणजे त्यांच्यांत रिकामीं भांडणें मात्र उदयास आलेली दिसतात. २ एखाद्या जमिनीच्या लहानशा तुकड्याकरितां भाऊ भाऊ एकमेकांशीं भांडून भिकारी होतात, पण त्यांचा तंटा सलोख्यानें आपसांत मिटत नाहीं. सावकार व कुळे, व्यापारी व गिच्हाईक, जमीनदार व जमिनीं करणारे, सरकारी कामदार आणि रयत, यांचा निल्यसंबंध असतां, ते एकमेकांच्या हिताकडे पाहात नाहीत; जो तो दुसच्यास बुडवून आपली पोतडी भरावयास पाहातो; पण ज्यानें त्यानें दुस-यास नागवण्याचा विचार केल्यास प्रत्येक जण नागवला जाईल, याची कल्पना कोणाच्याच मनांत येत नाहीं; असें कित्येक वेळ आढळतें. जातीजातींतही नवे नवे तंटे नित्य उद्भवत असतात, हें चांगलें नाहीं. ३ हिंदुस्थानदेश चित्रपटासारखा आहे. त्यांत अनेक जातीच्या व अनेक धर्माच्या लोकांची वस्ती आहे. त्यांनीं एवढयातेवढया