पान:Aagarakar.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार सुधारकांप्रमाणे होते. फार कशाला, गेल्या केसरींतील * देशोन्नति ' या सदराखालचा निबंध जो कोणी लक्ष लावून वाचील त्याला शास्त्रीबोवांचे जातिभेदासंबंधाने काय विचार होते हे सहज लक्षात येईल. इतके खरे आहे की ते या विषयासंबंधाने फारसे कधी लिहीत नसत; पण लिहू लागल्यास वृद्ध पिढीचा रोष होईल म्हणून आपली खरी मते पुढे करण्यास ते कधीही भीत नसत. सारांश, हिंदुस्थानचे पारतंत्र्य नष्ट होऊन तो स्वराज्याखाली सुखी होण्याचे कोणतेही साधन असल्यास त्याला ते अडथळा घेणारे नव्हते.  बरवेप्रकरण चालू असतां त्यांचा एकाएकी अंत झाला हे पाहून कोणी अधमांनी अशी कंडी उठविली की कारभाच्याला भिऊन जाऊन त्यांनी आत्महत्या केली. असले नीच नरपुंगव कोण असतील ते असोत. शास्त्रीबोवांना तर आपल्या लेखणीच्या सामथ्याविषयी अशी धमक होती की प्रसंग पडल्यास तुरुंगांतल्या तुरुंगांत * असल्या शेपन्नास राजशत्रूना सर्व महाराष्ट्राकडून मी ‘छी थू ' करून सोडीन.' असे ते म्हणत असत.
 शास्त्रीबोवांची ठळकठळक राजकीय व सामाजिक मलें सांगण्यांत आली. हिंदुस्थानच्या दारिद्याच्या संबंधाने त्यांची अशी खात्री झाली होती की येथे व्यापारवृद्ध झाल्याविना आमच्या देशाचे डोके वर निघणार नाहीं. याच उद्देशाने त्यांनी सरकारी दास्याची रुपेरी बिडी तोडून घेऊन पुणे येथे स्वतंत्रपणाने वास्तव्य करण्याचा विचार केला व एकीकडे अध्ययन, अध्यापन आणि ग्रंथरचना यांत आपला कालक्रम करण्याचा निश्चय करून दुसरीकडे आपल्या नजरेखाली छापखाना, चित्रशाळा, किताबखाना वगैरे कारखाने काढिले. लवकरच कांहीं खटपट करून कागदाचें एक यंत्रही आणविण्याचा त्यांचा विचार होता. हे धंदे त्यांनी द्रव्यसंपादनेच्छेनें काढिले 'असे नाही. कारण द्रव्यसंबंधाने शास्त्रीबोवा जितके निरपेक्ष होते तितका दुसरा पुरुष सांपडणे कठिण. त्यांचा हेतु असा असे की देशांत कारखाने निघून लोकांस काम मिळावे व त्यांस भाकरीची वाण पडू नये. शास्त्रीबोवांनी वर जे कारखाने काढिले त्यांत तरी त्यांचा येवढाच हेतु होता. त्यांपासून स्वतःचा फायदा करून घेण्याची इच्छा त्यांनी कधी धरली नाही. त्यांचे असे म्हणणे असे की बुद्धिवान् आणि चतुर लोकांनी मोठमोठे धंदे अंग