पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पद्धतीने जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्या ते सगळे मी पाहतोच आहे. पण बावन्न सालचा भ्रम आणि भ्रमनिरास आज नाही. स्वप्नाळूपणाची धुंदी आणि स्वप्नभंगाच्या व्यथा या दोन्हीही पासून दूर असलेल्या माझ्या मनाला आज पुनः पुन्हा इ.स. १९५२ सालचा मार्च आठवतोय. आपण वेडे त्यावेळी होतो की आज आहो, अगर नेहमीच आपण असे वेडे राहत आलो; व्यवहार आपल्याला कधी कळलाच नाही असे समजावे की आता आपण पुरेसे शहाणे झालेले आहोत असे समजावे, हे मात्र मला आजही ठरवता येत नाही.

***

(प्रसिद्धी : नागपूर पत्रिका, दिवाळी १९७९)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ३४